serial rapist taxi driver punishment for 384 years

 महिलांवरील अन्याय-अत्याचार आणि विनयभंगाच्या (rape and torture of women) प्रकारात वाढ होत असल्याने ठाण्यात(thane) महिलांच्या सुरक्षेचा(women safety) प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे पोलिसांच्या धडक कारवाई आणि सतर्कतेनंतरही महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे.

सुरेश साळवे, ठाणे : महिलांवरील अन्याय-अत्याचार आणि विनयभंगाच्या (rape and torture of women) प्रकारात वाढ होत असल्याने ठाण्यात(thane) महिलांच्या सुरक्षेचा(women safety) प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे पोलिसांच्या धडक कारवाई आणि सतर्कतेनंतरही महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. मागील आठ वर्षाच्या तुलनेत विनयभंग, घटनांमध्ये कधी वाढ तर कधी घट झालेली आढळते.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या विनभानाच्या गुन्ह्यात वाढ झालेली आहे. तर रोज किमान दोन तरी विनयभंगाच्या तक्रारी दाखल होत आहे. सन २०१८ या वर्षात ठाणे आयुक्तालयात विनयभंगाच्या ६३४ घटनांची नोंद झालेली आहे. तर २०१९ या वर्षात ६०३ घटना नोंद आहेत. तर सन २०२० च्या जानेवारी ते आक्टोंबर या लाकावधीत १८९ घटनांची नोंद आहे मार्च ते ऑगस्ट या दरम्यान लॉकडाऊन असल्याने घटनांमध्ये घसरण झाल्याचे चित्र आहे.

ठाणे पोलिसांची धडक कारवाई
महिलांसोबत गैरवर्तन करणारे रोडरोमियोंच्या विरोधात ठाणे पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम सुरु केली. पोलिसांच्या धडक कारवायांनंतरही गुन्हे नोंदीच्या संख्येवर अंकुश लागला नसल्याचे चित्र आहे. गुन्हे अन्वेषण आवाहलात अल्पवयीन मुली ते विवाहित महिलांची छळ आणि अत्याचाराच्या घटनेत १० ते २५ टक्के वाढ झाल्याचे आवाहलात नमूद करण्यात आलेले आहे. विशेषत: विवाहित विवाहितांच्या अन्याय-अत्याचारांच्या घटनेत कमतरता यावी म्हणून शासनाने विधायके बनवून आणि ठाणे पोलिसांनी मोहीम राबवून देखील घट झालेली दिसत नाही. २०१८ या वर्षाच्या जानेवारी ते डिसेंम्बर या वर्षभराच्या कालावधीत पोलीस आयुक्तालयात एकूण ६३४ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी५६६ गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. तर २०१९ या वर्षभरात ६०३ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

प्राची झाडेच्या घटनेने-ठाणे पोलीस खडबडून जागे
४ ऑगस्ट, २०१८ च्या प्राची झाडे घटनेने ठाणे हादरले. या घटनेस ठाणे पोलिसांनी रोडरोमियोंच्या विरोधात धडक कारवाई करण्याची मोहीम राबवली. ठाण्यात मुली-महिला असुरक्षित असलायची झोड उठल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्यात दाखल महिलांच्या छेडछाडी संदर्भातील तक्रारींचा आढावा घेऊन त्यांची सध्य स्थितीचे आवलोकन करावे असे आदेश पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते. तर तरुणीने तक्रार दाखल करताच कडक कारवाईचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले होते. तसे आवाहन पोलीस केले होते. ठाणे पोलिसांच्या धडक कारवाई नंतरही सन २०१८ आणि २०१९ च्या तक्रारीत फारशी घट झालेली नव्हती.

ठाणे आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यात मागील आठ वर्षात तरुणी-महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या नोंदी पाहता तक्रारीचा क्रम चढता असल्याचे दिसत आहे. तर लॉकडाऊनमुळे मात्र २०२० या वर्षात गुन्ह्यांचा घसरत क्रम असल्याचे दिसत आहे.

ठाण्यात घडलेल्या विनयभंगाच्या दाखल घटनांची आकडेवारी
# २०२० – १८९(ऑक्टोबरपर्यंत)
# २०१९ – ६०३
# २०१८ – ६३४
# २०१७ – ५०५
# २०१६ – ४५८
# २०१५ – ५६४
# २०१४ – ५५९
# २०१३ – ४६३