सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाणे महापालिकेत काम बंद आंदोलन

सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तसेच यावेळी आवरात त्यांनी एकत्र येत त्या घटनेचा निषेधही नोंदवला आहे.

    ठाणे – सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाणे महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचं महापालिका आवारात काम बंद आंदोलन सुरू आहे. सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तसेच यावेळी आवरात त्यांनी एकत्र येत त्या घटनेचा निषेधही नोंदवला आहे.

    ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षक या दोघांवरही जीवघेणा हल्ला झाला. त्यामध्ये त्यांच्या जीवालापण धोका होता. तो धोेका त्यांच्या बोटांवर निभावला. परंतु या घटनेनंतर लक्षात येतं की, तो फक्त त्यांच्यावर हल्ला नव्हता, तर तोे संपूर्ण प्रशासनावर हल्ला होता. महापालिकेच्या प्रशासन, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर असणारा हा हल्ला याचा निषेध म्हणून आपण येथे काम बंद आंदोेलन करत आहोत. असं अतिक्रमण उपायुक्त अश्विनी वाघमोळे यांनी म्हटलं आहे.