मुरबाडमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा, ऑनलाईन शैक्षणिक धोरणाचा निषेध

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आज श्रमजीवी संघटनेने मुरबाड पंचायत समिती प्रांगणात कार्यक्रम आयोजित केला होता. यात आदिवासी महिला, पुरुष, विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात संघटनेने सरकारच्या नव्या ऑनलाईन शैक्षणिक पद्धतीचा निषेध नोंदवला असून सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक तंत्रज्ञान पुरवावे अशी मागणी केली.

मुरबाड : मुरबाडमध्ये श्रमजीवी संघटनेच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संघटनेने सरकारच्या नव्या ऑनलाईन शैक्षणिक पद्धतीचा निषेध नोंदवला असून सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक तंत्रज्ञान पुरवावे अशी मागणी केली.

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आज श्रमजीवी संघटनेने मुरबाड पंचायत समिती प्रांगणात कार्यक्रम आयोजित केला होता. यात आदिवासी महिला, पुरुष, विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी संघटनेच्या वतीने पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी लेपटॉप, मोबाईल पुरवावेत, तसेच दुर्गम भागात इंटरनेट सेवा पुरवावी, तसेच अनेक ठिकाणी विजेची सोय नाही, त्याठिकाणी वीजेची सोय करावी, तसेच विद्यार्थ्यांना मासिक इंटरनेट डेटा, रिचार्ज पुरवावा अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष वसंत मूकणे, सचिव दिनेश जाधव, गटविकास अधिकारी रमेश अवचार, पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ उपस्थित होते.