Yeoor Banyal, a scenic tourist destination, is a hangout for alcoholics

ठाणे : ठाणे शहराच्या नकाशात जरी येऊर पर्यटन स्थळाच्या यादीत असले तरीही प्रत्यक्षात येऊरच्या निसर्गरम्य वातावरणातून पर्यटन संपुष्टात आले आहे. येऊर या हिल स्टेशनला काँक्रिटीकरणाची कीड लागली असून ढाबे आणि विनापरवाना मद्य पुरवणाऱ्या छोट्या-मोठ्या हॉटेल्सची भरमार आहे. यामुळेच या निसर्गरम्य पर्यटनस्थळ मद्यपींचा अड्डा झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता  महेंद्र सोनी यांनी अनेकवेळा पोलीस प्रशासन आणि महापालिकेला केलेली आहे. मात्र, येऊर हिल स्टेशनवर सुरु असलेली बेकायदेशीर हॉटेल्स, ढाबे आणि मद्यपींची जत्रा सुरूच आहे.

ठाण्याचे हिल स्टेशन अशी ख्याती असलेले येऊरच्या यापूर्वी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या. मात्र धाबे, हॉटेल्स आणि मद्यपींची जत्रा बंद होऊ शकली नाही. चक्क लॉकडाऊन मध्येही येऊर सुरूच होते. आता येऊर नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीत आहे.  ढाबे, हॉटेल्स आणि मद्यापींची जत्रा अशी झालेली आहे.

काँक्रिटीकरणाची कीड लागल्याने हिरव्यागार येऊरमध्ये हिरवळ नाहीशी होत आहे. चक्क क्रिकेटची मैदाने बंदिस्त बनवून ती भाड्याने देण्याचा फंडा सुरु असल्याची तक्रार माणसे प्रभाग अध्यक्ष स्वप्नील महिन्द्रीकर यांनी केलेली होती.  मात्र, यावर कुठल्याही प्रकारे आजतागायत कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे.

येऊरमध्ये सुरु असलेले बेकायदेशीर ढाबे आणि हॉटेल्स सोबतच विनापरवाना पुरविण्यात येणाऱ्या मद्य याकडे वर्तकनगर पोलिसांसोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक यांनी केला आहे. तर, शांत आणि निसर्गरम्य येऊर मधील कलकलाट आणि धुडगूस बंद होईल का? असा प्रश्न समाजसेवक यांच्यासह नागरिक उपस्थित करीत आहेत.

येऊरमध्ये काही हॉटेल्स कायदेशीर आहेत. इतर ढाबे हे बेकायदेशीरपणे चालत आहेत. ढाब्यांवर परवाना नसतानाही मद्य पुरविण्यात येते. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच येऊरच्या धुडगूस सर्वज्ञात आहे. पण याला पायबंद बसावा अशी मागणी महेंद्र सोनी यांनी केली आहे.