योगदान फाऊंडेशनतर्फे ‘आपले योगदान पक्ष्यांसाठी’ या स्पर्धेचे आयोजन, जाणून घ्या कशी आहे ही स्पर्धा

टिटवाळा : पक्षी संवर्धनासाठी गेली अनेक वर्ष सातत्याने काम करणाऱ्या टिटवाळा येथील योगदान फाऊंडेशनच्या वतीने ‘ आपले योगदान पक्ष्यांसाठी’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या

टिटवाळा : पक्षी संवर्धनासाठी गेली अनेक वर्ष सातत्याने काम करणाऱ्या टिटवाळा येथील योगदान फाऊंडेशनच्या वतीने ‘ आपले योगदान पक्ष्यांसाठी’ या स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. या उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी बाल्कनीत किवा अंगणात पाणी आणि खाद्य ठेवा.आणि पाणी पिण्यास जे पक्षी येतील त्याचे फोटो आम्हाला पाठवा. ज्या पाणवठ्यावर जास्त पक्षी येतील त्या मेंबरला योगदान फाऊंडेशनतर्फे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे योगदान फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

योगदान फाऊंडेशनचे अध्यक्ष मदन चव्हाण आणि सचिव रितेश कांबळे , कोषाधक्ष मनिष चव्हाण व त्यांचे सभासद एकत्र येऊन गेली अनेक वर्ष वेगवेगळे उपक्रम राबवत पक्षी संवर्धनाचे कार्य करत असून निसर्गाचा महत्वाचा घटक असलेल्या पक्ष्यांना वाचविण्यासाठी  विविध शाळा, कॉलेजमध्ये जाऊन पक्ष्यांच्या उपयोगी पाण्याचे व खाद्यचे पॉट उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत  .पुष्कळ ठिकाणी पक्ष्याचे पॉट लावून पक्ष्यांसाठी पाणी व खाद्य  उपलब्ध करून देत  आहेत. कडक उन्हाळ्यात पाण्याची सोय करून निसर्गावर असलेले प्रेम यातून व्यक्त होताना दिसत आहे.  लोकसहभातून संस्था निसर्ग व पक्षी संवर्धन घडविण्यासाठी गोवोगावी फिरून शाळेत जाऊन जनजागृतीचे देखील ते करत असतात . योगदान फाऊंडेशन टिटवाळाच्यावतीने आयोजित ‘ आपले योगदान पक्षांसाठी ’ या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक १०००  रुपये व्दितीय पारितोषिक ५००  रुपये आणि तृतीय पारितोषिक ३०० रुपये असणार आहे. बक्षीस वितरण ऑनलाईन पद्धतीने विजेत्याला गुगल पे किंवा बँक अकाउंटमध्ये पाठवले जाईल.

स्पर्धेचा कालावधी २७ एप्रिल २०२० ते २ मे २०२० असा ६ दिवस राहणार असून प्रत्येक दिवशी एक फोटो असे ६ दिवस पाणवठ्याचे वेगवेगळ्या पक्ष्यांचे जास्तीत जास्त फोटो  व्हॉट्स अॅप द्वारे पाठवावे. स्पर्धेमध्ये नोदणी करण्यासाठी आजच आपले नाव ७९७७३८७१४५  या नंबरवर  व्हॉट्सअॅप द्वारे  पाठवा. नाव नोंदणी २६ एप्रिल दुपारी ४ वाजेपर्यंत चालू राहील. आपल्या मुलांना पक्षी संवर्धन करण्यासाठी प्रेरित करा आणि तुम्ही पण सहकार्य करून या स्पर्धेत सहभागी व्हा. असे आवाहन योगदान फाऊंडेशनचे अध्यक्ष  मदन चव्हाण आणि सचिव रितेश कांबळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७९७७३२३६३० या क्रमांकावर संपर्क साधा.