Young man killed by drunkards in Dombivali

कल्याण : दारू पीत असताना बाटली खाली पडण्याच्या वादावरून सहाजणांनी बेदम मारहाण करत त्याच्या अंगावरून चारचाकी नेऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल येथे घडली. या हत्येतील सहा मारेकऱ्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रोहित गुरव (वय-२१), निखील सावंत(वय-२५)विनय लंका (वय-२२), निनाद म्हात्रे(वय-२२) सचिन पाटील(वय-३८) आणि विक्रांत तांडेल(वय-२५) अशी आरोपींची नावे आहेत.

शशांक महाजन असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र पिनाकिन कुलकर्णी याच्या फिर्यादीवरून अटक आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल येथे घटना घडली.

पिनाकिन हा मित्र शशांक महाजन बरोबर पहाटे १ वाजता सुमारास डोंबिवली पूर्वेकडील कैलास धाबा येथे दारू पीत बसले होते. त्याच्या बाजूच्या टेबलावर हे सहा आरोपी दारू पीत बसले होते. दारूची बाटली खाली पडल्याच्या वादावरून अटक आरोपी आणि पिनाकिन, शशांक यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या भांडणा राग सहा जणाच्या मनात होता.

पिनाकिन आणि शशांक या दोघांचा काटा काढण्याच्या इराद्याने सहाजणांनी धाब्याबाहेर पडलेल्या पिनाकिन आणि शशांक यांच्या दुचाकीचा चारचाकीने पाठलाग केला. डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल येथे दोघांना सहाजणांनी अडवले. त्यांना दुचाकीवरून खाली ओडून बेदम मारहाण मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सहाजणांनी त्यांची चारचाकी शशांकच्या अंगावरून नेत पळ काढला. यात शशांक जागीच मृत्यू पावला तर पिनाकीन जखमी झाली झाला.

मानपाडा पोलिसांनी सहाजणांना अटक केली असून ११ तारखेपर्यत अटक आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी दिली.