धक्कादायक घटना ! क्षुल्लक कारणावरून तरुण-तरुणीला बेल्टनं बेदम मारहाण ; हात जोडून विनवणी करूनही तरूणीला केली बुक्क्यांनी मारहाण ; VIDEO व्हायरल

खरंतर काल रात्री सव्वा बाराच्या सुमारास एक तरुण आणि तरुणी दुचाकीनं जात होतं. दरम्यान वाटेत त्यांच्या दुचाकीनं एका रिक्षाला किरकोळ धडक मारली. यावरून संबंधित तरुण आणि रिक्षा चालकात बाचाबाची झाली.

    कल्याण: एका दुचाकीनं ऑटो रिक्षाला किरकोळ धडक मारली होती. या कारणातून काही स्थानिक लोकांनी दुचाकीवरील एका तरुणाला आणि तरुणीला बेदम मारहाण  केली आहे. आरोपींनी संबंधित तरुणीचे केस पकडून तिलाही बुक्क्यांनी मारहाण केली आहे. ही घटना काल रात्री उशीरा कल्याण येथील काळसेवाडी भागात घडली.

    एका व्यक्तीनं या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यानं या पोस्टमध्ये ठाणे पोलिसांना देखील टॅग केलं आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

    नक्की काय घडलं ?

    खरंतर काल रात्री सव्वा बाराच्या सुमारास एक तरुण आणि तरुणी दुचाकीनं जात होतं. दरम्यान वाटेत त्यांच्या दुचाकीनं एका रिक्षाला किरकोळ धडक मारली. यावरून संबंधित तरुण आणि रिक्षा चालकात बाचाबाची झाली. यानंतर रिक्षा चालकानं आसपासच्या लोकांना गोळा करून तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावानं तरुणाला अश्लील भाषेत शिवीगाळ करत बुक्क्यांनी आणि बेल्टनं मारहाण करण्यास सुरुवात केली.तरुणीनं हात जोडून मित्राला न मारण्याची विनंती केली. तरीही आरोपी तरुण मारतच राहिले.

    दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमधून संतप्त भावना उमटत आहे.