प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

डोंबिवलीत भररस्त्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानावर हात उचलणाऱ्या माथेफिरू तरुणाला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्याची घटना घडली शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेर घटना घडली.हा प्रकार सुरु असताना नागरिक पोलिसांच्या मदतीला धावले.नागरिकांनी तरुणाला पडकले होते. तर बाहेरच्या गोंधळ एकून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी तरुणाच्या मुसक्या आवळल्या. गत ११ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील मंजूनाथ शाळेजवळ दुचालीस्वाराने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचे पाहताच नागरिकांनी त्याला चोप दिला होता. ह्या घटना पाठोपाठ ही दुसरी घटना घडली आहे.

कल्याण (Kalyan).  डोंबिवलीत भररस्त्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानावर हात उचलणाऱ्या माथेफिरू तरुणाला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्याची घटना घडली शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेर घटना घडली.हा प्रकार सुरु असताना नागरिक पोलिसांच्या मदतीला धावले.नागरिकांनी तरुणाला पडकले होते. तर बाहेरच्या गोंधळ एकून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी तरुणाच्या मुसक्या आवळल्या. गत ११ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील मंजूनाथ शाळेजवळ दुचालीस्वाराने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचे पाहताच नागरिकांनी त्याला चोप दिला होता. ह्या घटना पाठोपाठ ही दुसरी घटना घडली आहे.

नवीन मिळालेल्या माहितीनुसार,अभिषेक हेमचंद गुप्ता असे अटक आरोपीचे नाव आहे.तर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अमनकुमार सैनी यांच्या फिर्यादिवरून अभिषेकविरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अभिषेक आपल्या दुचाकीवर डोंबिवली पूर्वेकडील रामनगर तिकीट खिडकीसमोर आला.स्टेशनबाहेर पडणाऱ्या प्रवेशदाराजवळ दुचाकीस्वार पार्क केली. कर्त्यव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अमनकुमार सैनी यांनी अभिषेकला दुचाकी दुसऱ्या ठिकाणी पार्क करण्यास सांगितले जेणेकरून प्रवाश्यांना रेल्वे स्टेशनच्या आतक येण्यास अडचण येणार नाही.मात्र अभिषेकने सैनी यांचे म्हणणे न एकून घेता वाद घालण्यास सुरुवात केली.तर अभिषेक रेल्वे स्टेशनच्या अटक येण्याचा प्रयत्न करत असताना सैनी यांनी राज्य सरकारने रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी दिल्याचे कोणतेही ओळखपत्र दाखविण्यास सांगितले.

त्यावेळी अभिषेक याने सैनी यांना ` तुम्ही कोण मला विचारणारे` असे उलट उत्तर देत पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली.काही वेळाने अभिकेषने सैनी यांच्यावर हात उचलला.रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानावर तरुण हात उचलत असल्याचे पाहताना नागरिकांनी तरुणाला पकडले.नागरिकांनी पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी अभिषेकला पकडून रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.शनिवारी कल्याण न्यायालयात अभिकेषला हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवल्याचे आदेश दिले.