Girls Fighting in Kalyan

या दोन्ही तरुणी रांगेत उभ्या होत्या. नंबर वरून या दोघीमध्ये वाद झाल्याची माहिती लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांवर दिली या वादाचे पर्यावसान काही क्षणातच हाणामारी मध्ये झाले. लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवलं.

    कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिमेकडील होली क्रॉस शाळेतील लसीकरण केंद्रावर दोन तरुणींनी तुफान राडा घातला. यावेळी दोघींमध्ये जबरदस्त मारामारी झाली. या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    या दोन्ही तरुणी रांगेत उभ्या होत्या. नंबर वरून या दोघीमध्ये वाद झाल्याची माहिती लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांवर दिली या वादाचे पर्यावसान काही क्षणातच हाणामारी मध्ये झाले. लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवलं.

    या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, व्हिडिओ व्हायरल होताच कल्याण-डोंबिवली परिसरामधील नागरिकांनी लसीकरणाच्या बाबत प्रश्नचिन्ह करत पालिकेने लवकरात लवकर लसीचा साठा वाढून नागरिकांना द्यावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.