लॉकडाऊनमध्ये भाजीपाला व्यवसायातून तरुणांनी सावरला कुटुंबाचा आर्थिक डोलारा

टिटवाळा : मोहन्यातील तरूणाईने लॉकडाऊनमध्ये घरपोच भाजी व्यवसाय सुरु करीत आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा सावरला आहे. मोहन्यातील शनिवार पाटील नगर परिसरात राहणाऱ्या आकाश आंधळे या बारावी शिकलेल्या

 टिटवाळा : मोहन्यातील तरूणाईने लॉकडाऊनमध्ये घरपोच भाजी व्यवसाय सुरु करीत आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा सावरला आहे. मोहन्यातील शनिवार पाटील नगर परिसरात राहणाऱ्या आकाश आंधळे या बारावी शिकलेल्या तरूणाची लॉकडाऊनमध्ये सुरक्षारक्षकाची नोकरी गेली. अशा परिस्थितीत आपल्या रोजगाराचे साधन म्हणून मोहने परिसरात आकाश, संजय पंचाळ ,भाऊ विकास आधंळे एकत्र आले. काही संख्येने परप्रांतीय भाजी विक्रेते त्यांच्या गावी गेल्याने या संधीचा फायदा घेत आपण भाजीपाला विक्री करूयात हे त्यांनी ठरविले. वाहतूक व्यवसाय करणाऱ्या टिटवाळ्यातील रिजेन्सी येथे राहणारे समाधान शिंदे यांच्या टेम्पोद्वारे रात्री घोटी, नाशिक येथे जात संपर्क साधलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला थेट विकत घेण्याचे काम त्यांनी सुरु केले. तसेच पहाटे ताजा भाजीपाला मोहन्यातील ग्राहकांना सकाळी विक्रीसाठी उपलब्ध करून रोजगार निर्मिती करीत भाजीपाला व्यवसायात पर्दापण केले . मराठी तरूणाईने एक पाऊल टाकले आहे. भाजीपाल्याचे रोजची आवक व दर व्हॉटस अॅप ग्रुपमध्ये टाकत ग्राहकांना भाजीपाल्याची माहिती देत जे ग्राहक किमान २००रू भाजीपाला खरेदीची मागणी करतात अशा ग्राहकांना भाजीपाला घरपोच देण्यात येतो. तसेच शनिवार पाटील नगर परिसरात त्यांनी भाजीची गाडी लावली आहे. भाजीपाला व्यवसायातून आता आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत हे सक्षमीकरणाकडे वाटचाल करीत आहे.