Drama, natak

राज्य सरकारने नाट्यगृह काही अटी व शर्थींवर ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय(Drama Theaters  Will Be Open from 5th November) घेतला आहे.

    कोरोना(Corona) आणि लॉकडाऊनमुळे(Lockdown) गेल्या दीड वर्षांपासून नाट्यगृहे(Drama Theatres) बंद होती. मात्र आता महाराष्ट्रातील कलाकार आणि नाट्यकर्मींसाठी एक आनंदाची बातमी आहे.  राज्य सरकारने नाट्यगृह काही अटी व शर्थींवर ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय(Drama Theaters  Will Be Open from 5th November) घेतला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्य सरकारने ५० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

    अखिल भारतीय नाट्य परिषद आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर राज्यातील नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरु करण्याचे आदेश संबंधित शासकीय अधिकारी आणि विभागांना तात्काळ देण्यात आले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कलाकारांबरोबरच या क्षेत्रातील इतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात राज्य सरकारने नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी केली होती. मात्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला होता. आज अखेर आज राज्य सरकारने नाट्यगृह काही अटी व शर्थींवर ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिल्याने कलाकार व मनोरंजन क्षेत्राबरोबर संबंधित कर्मचारांनी आनंद व्यक्त केला आहे.