siddharth jadhav

लॉकडाऊनमुळे मनोरंजन विश्वावरही खूप परिणाम झाला. नाट्यगृहे(drama theater) तर कधी सुरु होतील, हे कोणालाच माहित नाही. अशातच अभिनेता सिद्धार्थ जाधवने(actor siddharth jadhav) नाट्यगृहाबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

कोरोनाच्या प्रसारामुळे मार्च महिन्यापासून सगळीकडे लॉकडाऊन सुरु झाले. या लॉकडाऊनचा परिणाम सगळ्याच क्षेत्रांवर झाला. लॉकडाऊनमुळे मनोरंजन विश्वावरही खूप परिणाम झाला. नाट्यगृहे(drama theater) तर कधी सुरु होतील, हे कोणालाच माहित नाही. अशातच अभिनेता सिद्धार्थ जाधवने(actor siddharth jadhav) नाट्यगृहाबद्दल एक भावनिक पोस्ट(emotional post) सोशल मीडियावर शेअर केली आहे. नाट्यगृह अशा अवस्थेत पाहवत नाही, अशा आशयाची ही पोस्ट आहे.

या पोस्टमध्ये नाट्यगृहाचे फोटो शेअर करून सिद्धार्थने लिहिले आहे की, शाळेच्या गॅदरिंगपासून ज्या स्टेजवर उभा राहायला शिकलो, नाटकं पाहीली, भरलेल्या प्रेक्षकांच्या साथीनं प्रयोग केले, त्या नाट्यगृहाचे असे फोटो पाहून ढसाढसा रडावसं वाटतंय, भरून आलंय…२०२० चा हा संकटकाळ अधिक कठीण होतोय ते पाहवत नाही. सर्वांसाठी प्रार्थना…काळजी घ्या.

लॉकडाऊननंतर कलाविश्वाचे काम थांबले होते. आता चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण सुरु झाले आहे.मात्र नाट्यव्यवसाय ठप्प आहे.