Tokyo Olympics 2020 | #Tokyo Olympic : ४१ वर्षांनी आला ऐतिहासिक क्षण! भारताला हॉकीमध्ये कांस्य पदक | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट2 महीने पहले

#Tokyo Olympic : ४१ वर्षांनी आला ऐतिहासिक क्षण! भारताला हॉकीमध्ये कांस्य पदक

ऑटो अपडेट
द्वारा- Navarashtra Staff
द्वारा- Kaustubh Khatu
09:01 AMAug 05, 2021

41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपला!

  • भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला आहे.  जर्मनीला 5-4 ने हरवत भारताने कांस्य पदक मिळवलेलं आहे. भारतीय संघाच्या विजयाने तब्बल 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपला आहे. भारताने हॉकीमधील शेवटचं पदक 1980 साली जिंकलं होतं…

  •  
08:58 AMAug 05, 2021

भारत 5-4 ने आघाडीवर

 
दोन मिनिटे खेळ शिल्लक. जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण भारताने शानदार बचाव केला. भारत अजूनही 5-4 ने आघाडीवर आहे.
08:54 AMAug 05, 2021

पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठविण्यात भारत अपयशी

  • 42 व्या मिनिटाला रुपिंदरचा शॉट जर्मन खेळाडूच्या पायाला लागला आणि भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण भारतीय संघ त्याचं गोलमध्ये रुपांतर करू शकला नाही. भारताला सलग दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि यावेळीही भारताला यश मिळाले नाही.

  •  
08:16 AMAug 05, 2021

5-3 गुणांनी भारतीय संघ आघाडीवर

तिसऱ्या सत्रात भारताने उत्तम सुरुवात केली आहे. भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि रुपिंदरने कोणतीही चूक केली नाही. रुपिंदरने चेंडू थेट गोलपोस्टमध्ये टाकला आणि भारताला महत्त्वपूर्ण आणि मजबूत आघाडी मिळवून दिली. भारत आता 4-3 ने आघाडीवर आहे.

08:16 AMAug 05, 2021

5-3 गुणांनी भारतीय संघ आघाडीवर

तिसऱ्या सत्रात भारताने उत्तम सुरुवात केली आहे. भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि रुपिंदरने कोणतीही चूक केली नाही. रुपिंदरने चेंडू थेट गोलपोस्टमध्ये टाकला आणि भारताला महत्त्वपूर्ण आणि मजबूत आघाडी मिळवून दिली. भारत आता 4-3 ने आघाडीवर आहे.

08:12 AMAug 05, 2021

पहिला पूर्वार्ध संपला

पहिला पूर्वार्ध संपला आहे. दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीकडून सलग दोन गोल केल्यानंतरही भारतीय संघ दबावाखाली आला नाही आणि दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केल्यामुळे भारताने 3-3 अशी बरोबरी साधली. भारतीय हॉकीसाठी पुढील 30 मिनिटे अत्यंत महत्त्वाची आहेत

08:09 AMAug 05, 2021

हॉकी (पुरुष) – भारताकडून 2 पेनल्टी कॉर्नरला 2गोल

  • 26 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, हरमनप्रीत सिंगचा ड्रॅग-फ्लिक जर्मन गोलरक्षकाने रोखलं पण हार्दिक सिंगने पुन्हा रिबाउंडवर गोल केला. यानंतर, संघाला 28 व्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि यावेळी हरमनप्रीत सिंगच्या ड्रॅग फ्लिकने भारताला 3-3 ची बरोबरी करुन दिली.

  •  

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाच्या सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या असल्या तरी, आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. कारण आज भारतीय पुरुष हॉकी संघ कांस्य पदकावर नाव कोरण्यासाठी मैदानावर उतरला असून भारत विरुध्द जर्मनी सामन्याला सुरुवात झाली आहे.

41 वर्षांनी सेमीफायनल्स गाठलेल्या हॉकी संघासाठी कांस्य पदकंही कमी नाही. कांस्य पदकावर नाव कोरण्याच्या आशेसह आता भारतीय पुरुष हॉकी संघ जर्मनीशी लढत आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२२ बुधवार
बुधवार, सप्टेंबर २२, २०२१

पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.