#Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय, सलग तिसऱ्या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक

भारत विरुद्ध जपानच्या सामन्याचा थरार सुरुवातीपासूनच पाहायला मिळाला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. पण सर्वात शेवटी भारतीय खेळाडूंनी आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर सामना खिशात घातला. सामन्यात भारताकडून हरमन, गुरुजंत सिंह आणि समशेरने गोल डागले.

    Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघानं जपानवर मात करत ५-३ अशा फरकानं विजय मिळवला आहे. भारतानं जपानला पराभूत करत ग्रुप स्टेजवर शेवटचा सामना जिंकला आहे. या विजयासोबत भारतीय पुरुष हॉकी संघाने क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. आता या संघाकडून पदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतानं ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या फॉर्मात आहे.

    टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघानं धमाकेदार विजय मिळवला आहे. भारतीय संघानं आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर जपानला ५-३ अशा फरकानं पराभूत केलं. जपानचा पराभव केल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ आपल्या ग्रुपमधील टॉपच्या संघांमध्ये सहभागी झाला आहे.

    भारत विरुद्ध जपानच्या सामन्याचा थरार सुरुवातीपासूनच पाहायला मिळाला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. पण सर्वात शेवटी भारतीय खेळाडूंनी आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर सामना खिशात घातला. सामन्यात भारताकडून हरमन(१), गुरजंत सिंह (२ )आणि समशेरने (१) गोल डागले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हरमनने आतापर्यंत ४ गोल डागले आहेत. भारतानं सुरुवातीपासूनच आक्रमक हॉकीच्या जोरावर जपानवर दबाव आणला होता.