#TokyoOlympic : विनेश फोगटची  उपांत्यपूर्व फेरीत धडक

राष्ट्रकुल आणि आशियाइ क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारी विनेश फोगट ही भारताची पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली आहे. त्यामुळे भारतीयांना विनेकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

    भारताला जिच्याकडून सुवर्णपदकाची मोठी अपेक्षा आहे ती कुस्तीपटू  विनेश फोगट आता उपांत्यपूर्व फेरीत पोहचली आहे. Women’s Wrestling मध्ये  ५३ किलो वजनी गटात विनेश फोगटने ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट सोफियाला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय. विनेशने प्रतिस्पर्धा खेळाडूला ७-१ अशा फरकाने पराभूत करत पुढची फेरी गाठलीये.

    राष्ट्रकुल आणि आशियाइ क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारी विनेश फोगट ही भारताची पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली आहे. त्यामुळे भारतीयांना विनेकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. तिने आजच्या लढतीत दमदार खेळ करत ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट सोफियाला हरवल्याने तिच्याकडून आता भारतीयांना मोठ्या अपेक्षा असतील.