पाहता पाहता अदृश्य होणारा पूल; चीनची अनोखी शक्कल

आर्किटेक्टच्या मते काच व स्टीलपासून बनविलेला हा पूल भक्कम आहे. या पुलावरून दोन टन वजनाचा ट्रक गेला तरी त्याला कोणतेही नुकसान होणार नाही.

तंत्रज्ञानात रोज कांही नवे करणाऱ्या चीनने आणखी एक अनोखे यश हासिल केले आहे. हुनान प्रांतात झांग्झियाजी येथील पहाडी भागात चीनच्या आर्किटेक्ट्सनी अत्यंत आकर्षक व पाहता पाहता अदृश्य होणारा पूल बांधला आहे. दोन पहाडांच्या मध्ये बांधल्या गेलेल्या या पुलाची लांबी ४३० मीटर आहे व तो जमिनीवरून त्याची उंची ३०० मीटर इतकी आहे.

काच, स्टेनलेस स्टील व काळ्या दगडात बांधला गेलेला हा पूल असा डिझाईन केला गेला आहे की दूरून पाहताना तो दिसतच नाही. या पुलासाठी ४० लाख पौंड खर्च केला गेला आहे. पुलावर उभे अ्रसलेले लोक दूरून पाहताना हवेत लटकल्यासारखे दिसतात. ऑप्टीकल इल्यूजन वर आधारित डिझाईनचा हा पूल हवा व कांचेमुळे अदृश्य होतो असे समजते. पुलाचा वरचा भाग दोन खडकात अंडाकार डिस्क बसविल्यासारखा आहे. या पहाडांमध्ये ढग तयार व्हावेत म्हणून दर सात मिनिटांनी पाण्याचे फवारे मारले जातात त्यामुळे पूलावर जाणाऱ्यांनाही ढगात विहरत असल्याचा भास होतो.

आर्किटेक्टच्या मते काच व स्टीलपासून बनविलेला हा पूल भक्कम आहे. या पुलावरून दोन टन वजनाचा ट्रक गेला तरी त्याला कोणतेही नुकसान होणार नाही.