एका किडनीवर जगणारे गाव; गरिबीमुळे संपूर्ण गावकऱ्यांनी विकली किडनी

या गावात राहणारी गीता सांगते की, दहा वर्षांपूर्वी एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तिने आपली किडनी काढली होती. त्याबदल्यात तिला त्या व्यक्तीकडून जवळपास सव्वा लाख रुपये मिळाले होते. चांगले आयुष्य जगण्यासाठी पैसा मिळविण्याच्या मोहापायी या गावाला अशा स्थितीत आणून ठेवले आहे.

नेपाळमधील एका गावची अनोखी ओळख आहे. या गावातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या मागील अनेक दशकांपासून फक्त एकाच किडनीवर जिवंत आहे. या आगळेपणामुळेच या गावाला किडनी गाव असेही म्हटले जाते. मात्र या गावाला ही खासियत एखाद्या आजारामुळे मिळालेली नाही, तर आपल्या गरिबीमुळे तिथले लोक एका किडनीसोबत जगत आहेत. म्हणजे आपल्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी ते थेट आपल्या किडनीचा सौदा करतात.

या गावात राहणारी गीता सांगते की, दहा वर्षांपूर्वी एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तिने आपली किडनी काढली होती. त्याबदल्यात तिला त्या व्यक्तीकडून जवळपास सव्वा लाख रुपये मिळाले होते. चांगले आयुष्य जगण्यासाठी पैसा मिळविण्याच्या मोहापायी या गावाला अशा स्थितीत आणून ठेवले आहे. गावातील बहुंताश तरुण उमेदीच्या वयात म्हणजे १८-२० वर्षीच आपली किडनी विकून टाकतात. आता तर जणून ही या गावाची परंपराच झाली आहे. ज्यावेळी एखाद्याला पैशांची निकड भासते, तेव्हा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची किडनी विकली जाते. चक्रावून टाकणारी गोष्ट अशी की, तिथल्या लोकांना यात काहीच वावगे वाटत नाही. किडनीचा सौदा त्यांना सामान्य बाब वाटते. छोट्याशा शस्त्रक्रियेद्वारे ही प्रक्रिया पूर्ण होते व दोन दिवसांनंनर शरीरातील एखादा अवयव काढून घेतला आहे ते समजतही नाही असे हे लोक सांगतात.