‘येथे’ केली जाते ख्रिसमस ट्रीची शेती; जगभरात आहे मागणी

प्लॅस्टिक किंवा कागद वापरून या ख्रिसमस ट्री तयार केल्या जातात. पण जगाच्या पाठीवर असेही काही देश आहे जिथे खरीखुरी ख्रिसमस ट्री ठेवली जाते. या ख्रिसमस ट्रीला इतकी मोठी मागणी आहे की त्यांची खास शेती केली जाते. स्कॉटलंडमधील ‘एडनमी ख्रिसमस ट्री’ फार्म यातले एक आहे.

स्कॉटलंड. नाताळाचा सणात प्रत्येक ख्रिस्ती बांधवांच्या घरात छोटीशी का होईना पण ख्रिसमस ट्री असतेच. रंगीबेरंगी चांदण्या आणि शोभेच्या वस्तूने सजवलेल्या या ख्रिसमस ट्री किती सुंदर दिसतात. आजकाल बाजारामध्ये कृत्रिम ख्रिसमस ट्री मिळतात. प्लॅस्टिक किंवा कागद वापरून या ख्रिसमस ट्री तयार केल्या जातात. पण जगाच्या पाठीवर असेही काही देश आहे जिथे खरीखुरी ख्रिसमस ट्री ठेवली जाते. या ख्रिसमस ट्रीला इतकी मोठी मागणी आहे की त्यांची खास शेती केली जाते. स्कॉटलंडमधील ‘एडनमी ख्रिसमस ट्री’ फार्म यातले एक आहे.

अशी घेतात काळजी

स्कॉटलंडमधल्या एडनमी फार्ममध्ये या ट्रीची शेती केली जाते. स्कॉट पाईन, फर, नॉर्डमन फर, स्प्रूस अशा अनेक प्रकारच्या झाडांची शेती येथे केली जाते. ही झाडे वर्षाला ३० सेंटीमीटर इतकी वाढतात. झाडे ठराविक उंचीची झाली की मग त्यांची विक्रीकरता कापणी करण्यात येते. येथे दरवर्षी या झाडांची शेती केली जाते. या शेतावर लाखो ख्रिसमस ट्रीची लागवड केली जाते. ही झाडे दीड दोन वर्षांची झाली की त्यांची कापणी करण्यात येते. या शेतावर काही झाडे ही सहा ते दहा वर्षे जुनी आहे. झाडांचा आकार जितका मोठा तितकी अधिक त्याची किंमत. साधरण मॉल किंवा सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या श्रीमंताच्या घरात या मोठ्या ख्रिसमस ट्रीला मागणी असते. या झाडांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. ही झाडे वाढताना त्यांचा आकार आणि उंची योग्य राहावी याची काळजी घेण्यात येते.

अनेक देशांमध्ये निर्यात

दरवर्षी १ डिसेंबरला या शेतामध्ये ख्रिसमस ट्रीची कापणी करायला सुरुवात होते. त्यानंतर या ख्रिसमस ट्री बांधून वेगवेगळ्या देशात निर्यात केल्या जातात. दरवर्षी युरोपात ८० लाखांहून अधिक खऱ्या ख्रिसमस ट्रीची विक्री होते. ख्रिसमस ट्री नाताळात घरात ठेवण्याची परंपरा उत्तर युरोपातून जगभर पसरली. १८३० मध्ये पहिल्यांदा ख्रिसमस ट्री लावण्यात आल्याचा उल्लेख द गार्डियनमध्ये आढळतो. या ख्रिसमस ट्री सफरचंद आणि चॉकलेट् अशा खाद्यपदार्थांनी सजवण्याची परंपरा होती. पण काळानुसार ही परंपरा बदलली आता कृत्रिम शोभेच्या वस्तू वापरून ख्रिसमस ट्री सजवण्यात येते.