खोल दरी आणि तरंगणारी हॉटेलची रूम; एकांत हवायं मग ‘येथे’ या

एका डोंगरकड्यावर असलेल्या तीन कॅप्सुल्स पर्यटकांसाठी आकषर्णाचा विषय ठरत आहेत. कस्को शहराला भेट देणार्‍या आणि निसर्गाच्या कुशीत राहण्याची आवड असणार्‍यांसाठी ही अक्षरश: पर्वणी आहे.

डोंगरदर्‍यांच्या मधोमध एखाद्या शांत ठिकाणी दिवसरात्र बसून राहावे अशी इच्छा तुम्हालाही होते का? कदाचित पेरूमधल्या अशाच एका नीरव दरीमध्ये वसलेले तरंगणारे हॉटेल तुम्हाला पेरु देशाला भेट देण्याची ओढ लावेल.

एका डोंगरकड्यावर असलेल्या तीन कॅप्सुल्स पर्यटकांसाठी आकषर्णाचा विषय ठरत आहेत. कस्को शहराला भेट देणार्‍या आणि निसर्गाच्या कुशीत राहण्याची आवड असणार्‍यांसाठी ही अक्षरश: पर्वणी आहे. अँल्युमिनिअमच्या फ्रेम असलेल्या या रुम्सच्या भिंती काचेच्या आहेत. त्यामुळे आतमध्ये बसल्या बसल्या तुम्ही कित्येक किलोमीटर अंतरावरील विहंगम दृश्य सहज पाहू शकता.

जमिनीपासून ४०० मीटर म्हणजे सुमारे १३१२ फुटांवर असलेल्या या कॅप्सुल्समध्ये ४ बेड, सोलर पॅनल्स आणि बाथरूम अशी व्यवस्था आहे. मात्र तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला मोठी कसरत करावी लागू शकते. ट्रेनने डोंगराच्या टोकापर्यंत पोहोचल्यानंतर हायकिंग करत तुमची रूम गाठावी लागेल.

एकदा रूममध्ये पोहोचले की तुम्ही मित्रमंडळींसोबत गप्पा मारा, गाणी ऐका, कॉफी प्या, जेवण बनवा, पुस्तक वाचत बसा, काहीतरी लिहा किंवा झोपा. इथे राहणे हा अवर्णनीय आनंद आहे, असे पर्यटकच सांगतात.