येथे महिला होतात दरवर्षी तीन महिन्यांसाठी विधवा; जाणून घ्या काय आहे ही भानगड!

येथील बेलवाडा जिल्ह्यातील दवरिया गावात प्रत्येक वर्षी तीन महिने ही प्रथा मानली जाते. येथील सौभाग्यवती महिला तीन महिने श्रृंगार करत नाहीत. मे ते जुलै या तीन महिन्यात येथे दुःखचा डोंगर उभा राहिलेला असतो.

    कोणत्याही पत्नीला सर्वाधिक दुःख हे पती निधनानंतरच होते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी भारतीय महिला खूप काही करत असतात. परंतु उत्तर प्रदेशमध्ये एक असे गाव आहे, जेथे प्रत्येक वर्षी महिला तीन महिन्यासाठी विधवा होतात.

    येथील बेलवाडा जिल्ह्यातील दवरिया गावात प्रत्येक वर्षी तीन महिने ही प्रथा मानली जाते. येथील सौभाग्यवती महिला तीन महिने श्रृंगार करत नाहीत. मे ते जुलै या तीन महिन्यात येथे दुःखचा डोंगर उभा राहिलेला असतो. परंतु तीन महिन्यात या दुःखाचे आनंदात रुपांतर होते.

    तुम्ही विचार करत असाल, की संपूर्ण गाव असे का करते ? तर आम्ही तुम्हाला सांगतो, की या गावातील सर्व पुरुष झाडांची ताडी काढण्याचे काम करतात. ताडांची ही झाडे सुमारे ५० फुटपेक्षाही उंच असतात. या झाडावर चढून ताडी काढणे हे खूपच कठीण काम असते. यामुळे कित्येकवेळा अनेकांचा मृत्यूही होत आहे.

    जेव्हा येथील पुरुष या कामासाठी बाहेर पडतात. तेव्हा त्यांच्या पत्नी स्वतःला विधवा मानतात. तसेच त्या विधवाचेच जीवनही जगतात. मात्र जेव्हा पती पुन्हा घरी येतो, तेव्हा त्या खूप उत्सहात त्याचे स्वागत करतात. तसेच संपूर्ण गावही याचा आनंद साजरा करते.