येथे महिला खोट्या दाढीमिशा लावून नोंदवितात निषेध; का ते जाणून घ्या

फ्रान्समधील महिला संघटनांनी पुरूषांच्या वर्चस्वाविरोधात निषेध नोंदविण्यासाठी असाच अनोखा मार्ग चोखाळला आहे. ला बार्बे नावाची एक महिला संघटना कांही महत्त्वाच्या बैठकीत पुरूषांचे अधिक वर्चस्व दिसले तर बेधडक बैठकीत घुसतात.

    आपल्याला न आवडलेल्या बाबींबाबत निषेध नोंदविण्याची परवानगी प्रत्येकाला आहे. मात्र निषेध नोंदविण्यासाठी कांही ठराविक पद्धत घालून दिली गेलेली नाही. प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे हे काम करतात. मोठ मोठ्या संस्था संघटनासुद्धा विचित्र पद्धतीने निषेध नोंदवितात हे आपण दररोज पाहतोच.

    फ्रान्समधील महिला संघटनांनी पुरूषांच्या वर्चस्वाविरोधात निषेध नोंदविण्यासाठी असाच अनोखा मार्ग चोखाळला आहे. ला बार्बे नावाची एक महिला संघटना कांही महत्त्वाच्या बैठकीत पुरूषांचे अधिक वर्चस्व दिसले तर बेधडक बैठकीत घुसतात. निषेध नोंदविण्यासाठी जाताना या महिला खोट्या दाढीमिशा लावून जातात.

    त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या १०० वर्षात फ्रान्सच्या सामाजिक जीवनात कांहीच बदल झालेला नाही. येथे अजूनही पुरूष प्रधान संस्कृतीच आहे. नाही म्हणायला पूर्वी पुरूष दाढीमिशा ठेवत आज ठेवत नाहीत एवढाच काय तो बदल दिसतोय. मात्र त्यांची मानसिकता आजही १०० वर्षांपूर्वी होती तशीच आहे. यामुळे आम्ही पुरूष वर्चस्वाच्या बैठकीत घुसतो आणि त्यांच्या या मानसिकतेचा धिक्कार करून निषेध नोंदवितो. त्यांना रितसर विरोधाचे निवेदनही सोपविले जाते म्हणे!