उंच सॅंडलच्या आकाराचे चर्च; अनोखे चर्च बनविण्यामागे ‘हे’ आहे कारण

काल्पनिक कथेतील सिंड्रेलाच्या सॅंडलवर आधारित ही संकल्पना आहे.

तैपेई. तैवानमध्ये महिलेच्या उंच सॅंडलच्या आकारासारखे चर्च तयार करण्यात आले आहे. महिलांनी या चर्चकडे आकर्षित होऊन येथे यावे, ही त्यामागील संकल्पना असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘बुदाई गावातील ओसिआन व्हिव पार्क येथे हे चर्च उभारले आहे. काल्पनिक कथेतील सिंड्रेलाच्या सॅंडलवर आधारित ही संकल्पना आहे. ५५ फूट उंच व ३६ फूट रुंद आकाराच्या सॅंडलच्या चर्चसाठी ३२० मोठ्या काचा लावण्यात आल्या आहेत. पर्यटनासाठी येथे नागरिक येऊ शकतील. शिवाय, विवाहासाठीसुद्धा हे स्थळ उत्तम व नेहमी लक्षात राहण्यासारखे असणार आहे.