भारतातल्या ‘या’ ठिकाणी शेंगदाण्यापेक्षाही स्वस्त मिळतात काजू; किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क

शेंगदाण्याला गरिबांचे काजू म्हंटले जाते. पण देशात अशी एक जागा आहे जिथे काजू  शेंगदाण्यापेक्षाही स्वस्त दरात उपलब्ध होतो.

काजू खाणे हा श्रीमंतांनी जोपासण्याचा छंद आहे असे म्हणतात. कारण गरिबांच्या खिशाला या काजूची किंमत न परवडणारी आहे. त्यामुळेच शेंगदाण्याला गरिबांचे काजू म्हंटले जाते. पण देशात अशी एक जागा आहे जिथे काजू  शेंगदाण्यापेक्षाही स्वस्त दरात उपलब्ध होतो. झारखंड राज्याच्या जामताडा जिल्ह्यात काजूची किंमत ही शेंगदाण्याच्या दरापेक्षाही कमी आहे.

काय आहे भाव?

जामताडा जिल्ह्यात फक्त १० ते २० रुपये किलो दराने काजू विकल्या जातो. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात कांद्या-बटाट्याची किंमतदेखील यापेक्षा जस्त आहे. दिल्लीत काजूसाठी जिथे ७००-८०० रुपये किलो दर द्यावा लागतो. तिथे झारखंडमध्ये हा काजू कवडीमोलाने विकल्या जातो.

kaju in jamtara

स्वस्त दराचे हे आहे कारण…

जामताडाच्या नाला भागात ४९ एकर काजूची बागायती शेती आहे. या शेतीत काम करणारी मुले व महिला हे काजू अतिशय स्वस्त दरात विकतात. ही शेती ब्लॉक कार्यालयापासून अगदी ४ किलोमीटर अंतरावर आहे. पण काजूच्या शेतीत अधिक फायदा होत असल्यामुळे अनेक जण या भागात शेती विकत घेतात.

कशी झाली सुरुवात?

जामाताडा येथे काजूच्या शेतीमागे एक विशेष घटना आहे. या विभागात राहणाऱ्या लोकांनुसार जामताडाचे माजी उपायुक्त कृपानंद झा यांना काजू अतिशय आवडत असत. त्यांनी विचार केला की जामताडामध्ये काजूची बाग तयार केली तर स्वस्त आणि ताजा काजू खायला मिळेल. त्यानंतर ते ओडिशातील काजूची शेती करणाऱ्यांना भेटायला गेले व कृषी संशोधकांनाही भेटले. या संशोधकांनी जमिनीची तपासणी केली. त्यानंतर काही वर्षांमध्येच इथे मोठ्या प्रमाणावर काजूची शेती होऊ लागली.

अनके जण तोडतात काजू

या बगिच्यांमध्ये दरवर्षी काजूचे भरपूर उत्पादन होते. योग्य पाहणी असल्यामुळे येणारे-जाणारे अनेक जण या बगिच्यांतून काजू तोडतात. ही बागायती शेती असणाऱ्या लोकांनी सरकारला या पिकाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. सरकारनेसुद्धा या पिकाला सुरक्षा देण्याचे व योग्य भाव देण्याचे आश्वासन दिले आहे.