…म्हणून खजुराहो येथे मंदिराबाहेर आहे कामक्रीडेच्या मूर्ती

खजुराहो लेणीची निर्मिती ज्या काळात झाली त्या काळातील राजे लोक भोग विलासात मग्न राहत असत. एका राजाच्या एकापेक्षा जास्त राण्या असत. यामुळे हे राजे लोक नेहमी उत्तेजित अवस्थेत राहत असत.

    मंदिर ही एक पवित्र जागा आहे हे मान्य आहे. परंतु मैथुन ही अपवित्र क्रिया आहे असे म्हणता येणार नाही, कारण जगाची निर्मिती मैथुनक्रियेमधूनच झालेली आहे. त्यामुळे खजुराहो येथील लेण्यांमध्ये कोरलेल्या कामक्रीडेच्या मूर्ती अपवित्र असल्याचे मानाने चुकीचे आहे.

    खजुराहो लेणीची निर्मिती ज्या काळात झाली त्या काळातील राजे लोक भोग विलासात मग्न राहत असत. एका राजाच्या एकापेक्षा जास्त राण्या असत. यामुळे हे राजे लोक नेहमी उत्तेजित अवस्थेत राहत असत. राजे लोकांचे असे विलासी जीवन दाखवण्यासाठी या लेण्यांची निर्मिती केली असावी असे अभ्यासकांचे मत आहे.

    दुसऱ्या एका मान्यतेनुसार त्या काळातील लोकांना लैंगिक शिक्षण देण्यासाठी या मूर्ती तयार केल्या असाव्यात. त्यामुळे या ठिकाणी अनेक मूर्ती वेगवेगळ्या संभोग आसनांमध्ये दाखवलेल्या आहेत. मंदिर ही अशी जागा आहे जिथे खूप लोक एकत्र येत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे शक्य होते.

    आणखी एका मान्यतेनुसार हिंदू धर्मात चार पुरुषार्थ सागितले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. परंतु सामान्यतः व्यक्तीला कामाचे जेवढे आकर्षण असते तेवढे धर्माचे नसते. म्हणून त्यांना धार्मिक कृत्याकडे आकर्षित करण्यासाठी हा मार्ग अवलंबला असु शकतो. काही अभ्यासणाच्या मते  त्याकाळी लोकांमध्ये लैंगिकतेविषयी आकर्षण खूपच कमी झाले होते. त्यामुळे प्रजननाचा दर खूपच कमी होता लोकसंख्या खूपच कमी होती. त्यामुळे प्रजननाचा दर वाढवून लोकसंख्या वाढावी या हेतूने खजुराहो लेणी तयार केली असावी.

    (साभार- अर्जुन शिरसाट)