आवडत्या पेयाने करा आंघोळ; ड्रिंक्सने भरले आहेत पूल

ज्या लोकांना ग्रीन टी आवडते. ते लोक येथे ग्रीन टीने आंघोळ करताना दिसतात. ज्यांना वाईन आवडते ते वाईनमध्ये आंघोळ करताना दिसतात. आंघोळ करताना ते वाईन सुद्धा पितात. तर ज्यांना कॉफी आवडते ते कॉफीने आंघोळ करतात.

जगभरातील लोक हे पाण्यानेच आंघोळ करतात. पण जपानमधील लोक हे त्यांच्या आवडत्या ड्रिंकने आंघोळ करतात. म्हणजेच येथील लोक चहा, कॉफी आणि वाईनने आंघोळ करतात. जपानमध्ये अशाप्रकारची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

एक असे स्पा जपानमध्ये आहे जिथे जाऊन लोक चहा, कॉफी आणि वाईनने आंघोळ करतात. या स्पामध्ये अशा ड्रिंक्सने भरलेले स्विमिंग पुलही आहेत. या स्पाचे नाव युनेससन स्पा रिसॉर्ट असे असून या स्पाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आता पाण्याने आंघोळ करण्याचा काळ गेला असल्याचे येथील लोकांना वाटते म्हणून का येथील लोक चहा, कॉफी आणि वाईनने आंघोळ करतात.

स्पामध्ये अनेक सुविधा

ज्या लोकांना ग्रीन टी आवडते. ते लोक येथे ग्रीन टीने आंघोळ करताना दिसतात. ज्यांना वाईन आवडते ते वाईनमध्ये आंघोळ करताना दिसतात. आंघोळ करताना ते वाईन सुद्धा पितात. तर ज्यांना कॉफी आवडते ते कॉफीने आंघोळ करतात. त्यासाठी खास व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या स्पामध्ये अशाप्रकारे आंघोळ करण्याचे फायदेही सांगितले जातात. वाईनने आंघोळ केल्याच लोकांच्या चेह-यावर तरूणांसारखे आकर्षण असते. चेह-यावरील डागांसाठीही याचा फायदा सांगण्यात आला आहे.