भीतीदायक बाहुल्यांचे रहस्यमयी बेट; बाहुल्या पाहून तुम्हालाही वाटेल भीती!

१९९० मध्ये या बेटाबाबत सर्वप्रथम माहिती मिळाली. सँन्टाना बर्रेरा नावाचा एक व्यक्ती या बेटावर पोहोचला. ते येथे आल्यानंतर काही दिवसांतच येथे फिरण्यासाठी आलेल्या छोट्या मुलीचा बुडून मृत्यू झाला.

मेक्सिको. मेक्सिकोमध्ये लाइला-दे-म्युनिकेस नावाचे बेट भितीदायक बाहुल्यांसाठी प्रसिद्ध आहे. मेक्सिको शहरापासून दक्षिणेकडे हे बेट आहे.

वास्तवात हे बेट म्हणजे एक तरंगणारे गार्डन आहे ज्याला मेक्सिकोमध्ये चिनमपा असे म्हटले जाते. या बेटावर शेकडोंच्या संख्येने झाडांना लटकलेल्या तुटलेल्या भयानक बाहुल्या आहेत.

१९९० मध्ये या बेटाबाबत सर्वप्रथम माहिती मिळाली. सँन्टाना बर्रेरा नावाचा एक व्यक्ती या बेटावर पोहोचला. ते येथे आल्यानंतर काही दिवसांतच येथे फिरण्यासाठी आलेल्या छोट्या मुलीचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर सँन्टाना यांना एक बाहुली पाण्यावर तरंगताना आढळली.

त्याने ही बाहुली झाडाला टांगून ठेवली. त्यानंतर त्याला ज्या बाहुल्या पाण्यावर तरंगताना दिसत तेव्हा तो झाडाला टांगून ठेवत असे. अशाप्रकारे येथे बाहुल्यांची संख्या वाढत गेली. २००१ मध्ये सँन्टानाचाही रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला.