राक्षसांच्या नावावरून पडली आहेत ‘या’ शहरांची नावे; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

प्रलंबासूर राक्षसाच्या नावावर या शहराचे नाव आहे जो मथुरेचा राजा कंस याचा मित्र होता. एकदा श्रीकृष्ण अन्य गोप व बलराम यांच्यासोबत खेळत होते, तेव्हा असून प्रलंबदेखील आपल्या मित्रांना भेटला....

  भारतात अशी अनेक शहरे आहेत, ज्यांची नावे भूतकाळातील राक्षसांच्या नावावर ठेवण्यात आले होते. काळानुसार त्यातील अनेक शहरांची नावे बदलत गेली. परंतु या शहरांच्या कहाण्या आजही सांगण्यात येतात की, एके काळी ही शहरे मोठमोठ्या दैत्यांच्या नावाने ओळखली जात होती.

  म्हैसूर

  पौराणिक कथांनुसार, महिषासूर नावाचा दैत्य होता. महिषासूराचे वडील रंभ दैत्यांचा राजा होता. या राजाचे पाण्यात राहणाऱ्या एका म्हशीवर प्रेम जडले. याच योगाने महिषासुराचा जन्म झाला. याच कारणाने महिषासूर इच्छेनुसार म्हैस व मानवाचे रूप घेऊ शकत होता. संस्कृतमध्ये महिषचा अर्थ म्हैस असा होता. तो ब्रह्माचा परमभक्त होता. म्हैसूरचे सुरुवातीला नाव महिषासुराच्या नावावर ठेवले होते, जे पहिले महिषा सुरू होते, नंतर महिषुरु झाले. कन्नडमध्ये यास मैसुरू म्हटले जाते व आता म्हैसूर. म्हैसूरमध्ये महिषासुराची एक मोठी प्रतिमा लावण्यात आली आहे.

  जालंधर

  जालंधर शहराचे नाव जलंधर नावाच्या राक्षसाच्या नावावर ठेवण्यात आले. असे सांगण्यात येते की, जलंधर देखील शंकराचा पुत्र होता. पौराणिक कथांमध्ये त्यास भगवान शिवाचा सर्वांत मोठा शत्रू असल्याचे सांगण्यात येते. श्रीमद देवी भागवत पुराणानुसार जलंधर असूर शिवाचा अंश होता. परंतु याविषयी त्याला माहीत नव्हते. जलंधर अतिशय शक्तिशाली राक्षस होता. इंद्राला पराजित करून जलंधर तिन्ही लोकांचा स्वामी झाला. यमराजही त्याला घाबरत होते, असे सांगण्यात येते. पंजाबच्या या शहरात आजही असुरराज जलंधरची पत्नी देवी वृंदाचे मंदिय मोहल्ला कोट किशनचंदमध्ये आहे. मान्यता आहे की, येथे एक प्राचीन गुहा होती, जी थेट हरिद्वारपर्यंत जात होती. प्राचीन काळात या नगराजवळ 12 तलाव होते. नगरात जाण्यासाठी नावेचा उपयोग करावा लागत असे, असे मानण्यात येते.


  तिरुचिरापल्ली

  तामिळनाडूचे शहर तिरुचिरापल्लीचे नावदेखील एका राक्षसाच्या नाववरून पडले आहे. मान्यतांनुसार, येथे थिरीसिरन नावाचा राक्षस होता, जो शंकराची घनघोर तपस्या करीत होता. ज्या जागेवर तो राहात होता, तेथील लोक त्याला थिरी सिकरपुरम म्हणू लागले. नंतर ते तिरुचिरापल्ली झाले. हे शहर प्राचीन काळात चोल साम्राज्याचा भाग होता. आता ते तामिळनाडूच्या मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. यास त्रिची असेही म्हटले जाते. हे शहर श्रीरंगानाथस्वामी मंदिर, श्रीजम्बुकेश्वरा मंदिर व वरैयुरा अशा अनेक खास मंदिरांसाठीही ओळखले जाते.

  गया

  गया शहरात एके काळी गयासूर नावाचा राक्षस राहात होता. या शहराचे नावही त्याच्याच नाववरून पडले आहे. यासाठी या शहरातील लोक अनेक कहाण्या सांगतात. हे विष्णुपद मंदिर आहे. या मंदिराचे गयासुराशी विशेष नाते आहे. भगवान विष्णूंनी जेव्हा या दैत्याचा वध केला होता, तेव्हा याठिकाणी विष्णूंजे पायाची चिन्हे उमटली होती. त्यानंतर इथे मंदिर बनले, ज्यास विष्णुपद मंदिर म्हटले जाते. गया मुक्तिधामाच्या रूपातही प्रसिद्ध आहे. देशभरातून लोक इथे येऊन आपल्या पितरांचे श्राद्ध करतात. गया बौद्ध व जैन धर्मासाठीही ऐतिहासित महत्त्वाचे आहे. येथे अनके विश्वप्रसिद्ध बौद्ध मंदिर व स्थान आहेत. हे बिहारचे दुसरे मोठे शहर आहे. या शहराचा उल्लेख रामायण व महाभारतातही मिळतो. गया तिन्ही बाजूंनी पर्वतांनी वेढलेले आहे. या पर्वतांची नावे मंगलागौरी, श्रृंगस्थान, रामशिला व ब्रह्मयोनी आहे. नगरच्या पूर्वभागात फल्गू नदी वाहते.

  पलवल

  प्रलंबासूर राक्षसाच्या नावावर या शहराचे नाव आहे जो मथुरेचा राजा कंस याचा मित्र होता. एकदा श्रीकृष्ण अन्य गोप व बलराम यांच्यासोबत खेळत होते, तेव्हा असून प्रलंबदेखील आपल्या मित्रांना भेटला. नंतर तो बलरामाच्या खांद्यावर बसून हळूच पळाला. बलरामाने तेव्हा आपल्या शरीराचा भार इतका वाढविला की प्रलंबासुराला पळणे कठीण झाले. त्याला चालण्यासही त्रास होऊ लागला. तेव्हा प्रलंबासूर व बलरामामध्ये युद्ध झाले आणि प्रलंबासूर मारला केला. पलवलचे नाव याच प्रलंबसूर राक्षसाच्या नावावर पडले. या शहराला पलंबरपूरदेखील म्हटले जाते. परंतु काळानुसार नाव बदलून ते आता पलवल करण्यात आले आहे. या शहराचे स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदानदेखील आहे.