किनारा आहे पण समुद्र नाही; पृथ्वीवरचे अजब ठिकाण

प्लाया डी गुलप्युरी बीच असे या ठिकाणाचे नांव आहे आणि पर्यटक येथे खूप मोठ्या संख्येने भेट देत असतात. स्पेनच्या उत्तरेकडे लेनेज नावाच्या छोट्याशा गावांत हे अद्भूत आहे.

समुद्र म्हटला की प्रथम नजरेसमोर येतो तो लाटांचा खळखळाट आणि लांबलचक, शांत सुंदर किनारा. ज्या समुद्राला असा किनारा नाही तो समुद्र आकर्षक वाटत नाही. मात्र स्पेनमध्ये सुंदर किनारा तर आहे पण समुद्र नाही असे एक ठिकाण आहे आणि ते अतिशय सुंदर आहे.

समुद्रापासून १०० मीटर दूर

प्लाया डी गुलप्युरी बीच असे या ठिकाणाचे नांव आहे आणि पर्यटक येथे खूप मोठ्या संख्येने भेट देत असतात. स्पेनच्या उत्तरेकडे लेनेज नावाच्या छोट्याशा गावांत हे अद्भूत आहे. येथे समुद्राचे खारे पाणी आहे मात्र चारी बाजूंनी उंच पहाड आहेत. या सुंदर किनार्‍यापासून समुद्र १०० मीटर दूर आहे.

अटलांटिक महासागराच्या बिस्कॉय खाडीमध्ये हे नवल लपले आहे. येथील किनारा समुद्रसपाटीपासून ३०० फूट उंचीवर आहे. येथे समुद्राचेच पाणी आहे पण ते भोवतीच्या डोंगरात असलेल्या नैसर्गिक बोगद्यातून येथे येते. हे बोगदे किवा गुहा अटलांटिक महासागराला जोडलेल्या आहेत. समुद्र भरतीच्या वेळी लाटा या गुहांतून आत येतात आणि ते पाणी येथे साठते. मात्र ओहोटीच्या वेळी या डोंगरांमुळे ते परत फिरू शकत नाही. अशा रितीने येथे समुद्र नाही पण किनारा आहे हे नवल घडले आहे.