navarashtra

आपल्या अनोख्या रचनेमुळे जगभरातील पर्यटकांना हे शहर आकर्षित करीत आहे. अनेकांनी या शहराचे नाव अतुल्या आशियाना असे ठेवले आहे.

मानव आपल्या वास्तव्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत असतो. कधी तो पर्वतांवर आपली वस्ती तयार करतो तर कधी झाडांवर. कधी आकाशात तर कधी पाण्यावर. पण जगात असे एक शहर आहे जे खनिज तेलाच्या साठ्यावर उभे राहिले आहे. अजरबॅजानची राजधानी बॅक्रूपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असणारे हे शहर तेलाच्या साठ्यावर वसलेले आहे. नेफ्ट डासलॅरी असे या शहराचे नाव असून शहर उभारणीसाठी तेलाच्या वर प्लॅटफॉर्मसारखी रचना तयार करण्यात आली आहे. इथे सुमारे ३००० लोक राहतात. आपल्या अनोख्या रचनेमुळे जगभरातील पर्यटकांना हे शहर आकर्षित करीत आहे. अनेकांनी या शहराचे नाव अतुल्या आशियाना असे ठेवले आहे.

शहर खनिज तेलाच्या साठ्यावर असल्याकारणाने इथे राहणाऱ्या लोकांकडे सगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या काळात खराब व निकामी झालेल्या काही जहाजांवर या शहराचा पाया ठेवण्यात आला होता. मात्र, पुढे एका ऑईल प्लॅटफॉर्मवर हे शहर वसू लागले. अजरबॅजान देशात खनिज तेलाची विपुलता आहे. हा देश तिसऱ्या-चौथ्या शतकापासून पेट्रोलियम पदार्थांचा व्यापार करत आहे. त्यामुळेच या देशाला लँड ऑफ फायर म्हणून ओळखले जाते. या देशात १८७० पासून खनिज तेल काढण्याचे काम सुरू आहे. पण त्यावेळी हा देश सोव्हियत रशियन संघाच्या कब्जात होता.