ट्रेकिंग करायची आहे? चला तर मग करूयात सैर राजगडची

विविध गड, किल्ले, शिखरांवर ट्रेक करण्याची आवड अनेकांना असते. काही ट्रेकर्स तर आठवड्यातून एकदा हमखास ट्रेकिंग ला जातातच. पण ट्रेकिंग ल जाण्याआधी त्या ठिकाणील पूर्ण माहिती असणे गरजेचे असते. त्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारे रस्ते, कोणत्या अडचणी येऊ शकतात या सगळ्याचा विचार करून ट्रेकिंग ला सुरुवात करणे गरजेचे असते. आज आपण जाणून घेऊयात अशाच एका गडाबद्दल जो ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.

 विविध गड, किल्ले, शिखरांवर ट्रेक करण्याची आवड अनेकांना असते. काही ट्रेकर्स तर आठवड्यातून एकदा हमखास ट्रेकिंग ला जातातच. पण ट्रेकिंग ल जाण्याआधी त्या ठिकाणील पूर्ण माहिती असणे गरजेचे असते. त्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारे रस्ते, कोणत्या अडचणी येऊ शकतात या सगळ्याचा विचार करून ट्रेकिंग ला सुरुवात करणे गरजेचे असते. आज आपण जाणून घेऊयात अशाच एका गडाबद्दल जो ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. 

किल्ले राजगड-
 
राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.
गडावर कसे जावे- 
राजगड पुण्याहून ५०-५५ कि.मी अंतरावर असून पुणे-सातारा महामार्गावर नसरापूर फाट्याला उतरावे. फाट्यापासून नसरापूर १ कि.मी अंतरावर आहे. नसरापूरवरुन राजगड २०-२५ कि.मी वर आहे.
राजगडावर जाण्यासाठी ६-७ पाऊलवाटा आहेत. त्यापॅकी ३ वापरात नसलेल्या, दाट झाडीने व अतिशय अवघड चढ-उतरणीमुळे तसेच रस्ता चुकण्याच्या शक्यतेमुळे दुर्लक्षित आहेत.
राजगडावर काय पहावे- 
सुवेळा माची
पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडे वर आले की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरूज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. 
पद्मावती तलाव
गुप्तदरवाज्याकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे
राजवाडा
रामेश्र्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. 
गुंजवण दरवाजा
गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाज्याला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरूज आहेत. गुंजवणे दरवाज्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे.
पद्मावती मंदिर
२००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले, असा उल्लेख आढळतो. 
संजीवनी माची
सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली गेली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत.
बालेकिल्ला
राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे.