गडचिरोली जिल्ह्यात १५ नवीन कोरोना बाधित

  • जिल्हयात आज १८ कोरोनामुक्त

गडचिरोली. जिल्हयात आज १८ जण कोरोनामुक्त (corona free) झाले असून  त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली (Gadchiroli) येथील ६, चमोर्शी येथील ६, आरमोरी ३, कोरची, एटापल्ली व भामरागड एक एक असे एकूण १८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तर १५ नवीन कोरोना बाधितांमध्ये नागपूर, औरंगाबाद वरून आलेले गडचिरोली येथील तिघे, चामोर्शी मधील ३ यामधे आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतर दोन कोरोना बाधिताच्या संपर्कातील, मुलचेरा येथील कोरोना कोविड सेंटरमध्ये ड्युटीवर असलेला शिक्षक, वडसा येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील तीघे, धानोरा येथील पोलिसाचा संपर्कातील पाच जण असे आज एकूण १५ जण कोरोना बाधित आढळून आले.

यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ३०१ झाली असून एकुण बाधित संख्या १२२९ झाली आहे. आत्तापर्यंत एकूण ९२७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.