बाप्पांच्या मुर्त्या बुकींगच्या प्रतीक्षेत!

नागपूर,

 सणासुदीचे दिवस सुरु झाले की, एक वेगळाच उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळतो.  जुलै महिन्याच्या अखेरीस बाप्पांच्या आगमनाचे वेध लागतात. नागपुरच्या चितारओळीत मंडळाच्या तसेच घरघुती गणेश मुर्त्या साकारल्या जातात. दरवर्षी प्रमाणे यंदाही मूर्तिकारांनी मोठ्या प्रमाणात मुर्त्या बनविल्या आहेत पण यंदा मात्र सर्वच सणांना कोरोनाचे ग्रहण लागल्याने मूर्तिकारांवर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे. अनेक मुर्त्यांची सांगरंगोटी अंतिम टप्यात असली तरी अद्याप बुकिंग न झाल्याने मूर्तिकार चिंतेत आहे.

 

गणेश मूर्ती बनविण्याच्या व्यवसायातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल नागपूरच्या  चितारओळीमध्ये होत असते. मूर्तिकारांपासून ते विक्रेत्यांपर्यंत हजारो हातांना रोजगार मिळतो. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने या सर्वांवरच आर्थिक दरड कोसळली आहे.