वाशिममध्ये १८२ रुग्ण क्रियाशील

वाशीम,

जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दुपारपर्यंत जिल्ह्यात एकुण 309 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद असून, त्यापैकी क्रियाशील रुग्ण 182 आहेत. 120 बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर एकूण 07 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  कोरोनाचा वाढता कहर पाहता जिल्हाधिकारी वाशीम यांनी 15 ते 21 जुलै पर्यंत वाशीम, मालेगाव, कारंजा, मानोरा या शहरात 2 वाजतापासून पुढे टाळेबंदी लागू केली आहे.