वाशीम शहरात २० नवीन कोरोना बाधितांची नोंद

  • जिल्ह्याबाहेर २४ कोरोना बाधित

वाशीम.  वाशिम शहरातील बाकलीवाल कॉलनी परिसरातील १, मानोरा तालुक्यातील चिखली येथील ४, आसोला येथील ३, सोमनाथनगर येथील २, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १, भरजहांगीर, १ कारंजा लाड शहरातील सुदर्शन कॉलनी परिसरातील २, साळीपुरा येथील २, रंगारीपुरा येथील २, भिलखेड येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

गेल्या काही दिवसांत वाशिम जिल्ह्यातील २४ व्यक्ती जिल्ह्याबाहेर कोरोना बाधित आढळल्या आहेत. त्यापैकी ११ व्यक्तींना डिस्चार्ज मिळाला असून १३ व्यक्ती उपचार घेत आहेत. त्यांचा समावेश जिल्ह्याच्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीत करून जिल्ह्याची आकडेवारी अद्ययावत करण्यात आली आहे.

दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी कोरोना बाधित आढळलेल्या वाशिम तालुक्यातील वारा जहांगीर येथील ६० वर्षीय महिलेचा , १९ ऑगस्ट रोजी  सायंकाळी, तर ७ ऑगस्ट रोजी कोरोना बाधित आढळलेल्या कारंजा लाड तालुक्यातील सोहळ येथील ४० वर्षीय व्यक्तीचा काल पहाटे २ वाजताच्या दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.