चंद्रपुरात १५ नवीन कोरोना बाधितांची नोंद

चंद्रपूर,

गेल्या २४ तासात चंद्रपूर जिल्ह्यातील १५ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे  जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची काल दुपारी २२८ असणारी संख्या २४३ झाली आहे. 

कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी दहा दिवस चंद्रपूर शहर देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविले असून आरोग्यसेतूचा वापर व ॲन्टीजेन चाचणीमुळे बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.