अतिवृष्टीमुळे फळ व भाजीपाला पिकांचे ४० लाखाचे नुकसान

गोंदिया. सडक अर्जुनी तालुक्यात ८ व ९ तसे २०-२१ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे बागायती शेती करणाऱ्या नदीकाठावरील शेतकऱ्यांचे कोटयावधीचे उत्पन्न डुबले. तालुक्यातील शेतकरी सात महिन्यांपासून बागायती शेतीमध्ये फळ व भाजीपालाचे उत्पन्न काढत होते. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील सौंदड मंडळात २१ ऑगस्टला रात्री ढगफुटी प्रमाणे पाऊस पडल्याने सौंदड येथील हायवे लगत चा तलावाला रपटा फुटले. तळयाजवळील शेतकऱ्यांचे बागायती वाड्यामध्ये ४ ते ६फुट पाणी साचल्याने वाड्यामध्ये लावलेले पिक वाहून गेले व मासेमार ढिवर समाजाचे अंदाजे १५ लाखाच्या मासोळ्या वाहुन गेल्या. सिंदीपार व सौंदड येथील विठ्ठले व कापगते तसेच नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. सिंदीपार येथील शेतकरी कापगते याची शेती राका रोडला लागून नदीच्या बाजूला असलेल्या सात एकर फळबाग शेतीमध्ये दिड एकर शेतीत टरबुज,एक एकर मध्ये कारले, एक एकरमध्ये काकडी, एक एकर मध्ये चवळी, साडेतीन एकरमध्ये कोहळा लावला होता. आतापर्यंत या शेतकऱ्याचे साडे चार लाख रुपये खर्च झाले होते. या फळबागेतुन या शेतकऱ्याला १५ ते २० लाखाचे उत्पन्न झाले असते.परंतु झालेल्या अतिवृष्टीत ढगफुटी पाऊसामुळे डोळ्यासमोर हाती आलेले पिक नदीच्या पुरामुळे वाहुन गेले. या फळबागेतील चवळी व कारले तीन दिवसांनंतर विक्रीला जाणार होते. पण,निसर्गाच्या कोपामुळे एका झटक्यात संपूर्ण पिक नेस्तनाबूत केले. लावलेले सिंचन साधनसामग्री सुद्धा वाहुन गेले.