यवतमाळमध्ये ठणठणीत झालेल्या ४२ रुग्णांना सुट्टी

  •  ५५ रुग्ण नव्याने पाॅझिटिव्ह

यवतमाळ.  येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ४२ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ५५ पाॅझिटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

आज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या ५५ जणांमध्ये ३४ पुरुष आणि २१ महिला आहेत. यात पांढरकवडा शहरातील दोन पुरुष आणि शहरातील दोन पुरुष, वणी शहरातील एक महिला व वणी येथील दोन महिला व एक पुरुष, महागाव शहरातील तीन पुरुष, दिग्रस शहरातील तीन पुरुष व पाच महिला, दिग्रस शहरातील नागोबा मंदीर येथील एक पुरुष, पुसद शहरातील दोन महिला, पुसद शहरातील गायमुख नगर येथील दोन पुरुष, स्टेट बँक चैक येथील एक पुरुष व एक महिला, पुसद तालुक्यातील जाम बाजार येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील चार पुरुष व तीन महिला, यवतमाळ शहरातील पिंपळगाव येथील एक महिला, तलावफैल येथील एक पुरुष, सिव्हील लाईन पिस्ता शॉप येथील दोन पुरुष, अग्रवाल ले-आऊट येथील दोन महिला व एक पुरुष, वंजारी फैल येथील एक पुरुष, यवतमाळ येथील तीन पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील मोझर येथील दोन महिला व एक पुरुष, झरी शहरातील मुकुटबन येथील आरसीसीपीसी कंपनीतील चार पुरुष, मानोरा ग्रामीण पांचाळा येथील एक महिला आणि दारव्हा शहरातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ६१३ अॅक्टिव्ह पाॅझिटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर १९५ जण आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या २५७७ झाली आहे. यापैकी १७०६ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ६३ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १५५ जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी १५० नमुने तपासणीकरिता पाठविले आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत ४०८५२ नमुने पाठविले असून यापैकी ३९९९४ प्राप्त तर ८५८ अप्राप्त आहेत. तसेच ३७४१७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.