ऑनलाईन खरेदी करून 65 हजाराने फसवणूक

अमरावती,

खोटी माहिती देऊन एका क्रेडिट कार्डधारकाच्या खात्यातून 65 हजार 650 रुपयांची ऑनलाईन खरेदी केल्याचा प्रकार बुधवारी साईनगरात उघडकीस आला. नितीन महादेव बोरे (47, रा. साईनगर) यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावर कॉल आला. संबंधित व्यक्तीने खोटी माहिती देऊन नितीनच्या क्रेडिटमधून ऑनलाईन खरेदी करून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. या घटनेच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी एका मोबाईल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.