रिसोडमध्ये आणखी ७ कोरोना बाधित

  • एकाचा मृत्यू

 

रिसोड,

शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील ३ व गजानन महाराज मंदिर परिसरातील १, कारंजा लाड शहरातील साई नगर परिसरातील २ आणि वाशिम शहरातील फकीरपुरा परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. अकोला येथे उपचार घेत असलेल्या मालेगाव व मंगरुळपीर येथील व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये ११ जुलै रोजी पॉझिटिव्ह आढळलेल्या मालेगाव येथील महिलेचा उपचारादरम्यान  १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वा. दरम्यान जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. सदर महिलेला न्यूमोनिया होता.