प्रेमी युगलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

  • मंगळवार पासून होते बेपत्ता

पुलगांव. गुंजखेडा परिसरात प्रेमीयुगलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उशीरा उघडकीस आली. रवी नानाजी कात्रे (२३) असे तरूणाचे तर वृषाली मारोती मुसळे (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. दोन्ही गुंजखेडा येथील रहिवासी असून मंगळवार पासून दोघेही बेपत्ता होते.

शुक्रवारी सायंकाळी परिसरातील एकनाथ ब्राह्मणकर यांच्या शेतातील विहिरीत  मृतदेह शेतक-याला दिसताच खळबळ उडाली. या दोघांचे अनेक दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती आहे. या दोघांनी आत्महत्या का केली? याचा अद्याप खुलासा झाला नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाला सुरवात केली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.