बुलडाण्यात टेस्टिंग लॅब सुरू होणार

शासनाकडे प्रस्ताव सादर

बुलडाणा,

कोरोना संशयित रुग्णांचे घेतलेले स्वॅब रिपोर्ट लवकर मिळावे यासाठी बुलडाणा येथे कोरोना टेस्टिंग लॅब लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. कोरोना स्वॅब टेस्टिंग सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती ना. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्याने आ. महाले यांच्या मागणीला यश येण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला अकोला येथे लॅब सुरू झाली. त्यानंतर राज्यभरात जवळपास सर्व जिल्ह्यात 100 कोरोना टेस्टिंग लॅब सुरू झाल्या. बुलडाणा जिल्हा मोठा असतानाही येथे लॅब सुरू न झाल्याने जिल्ह्यातील संशयित रुग्णांचा रिपोर्ट तातडीने मिळत नाही. जिल्ह्यातील अनेक संशयितांचे रिपोर्ट सुटी झाल्यानंतर पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाचा प्रसार होण्यास उशिरा रिपोर्ट येणे हे सुद्धा एक कारण ठरले आहे. बुलडाणा येथे स्वतंत्र तपासणी लॅब सुरू करण्याची मागणी आ. महाले यांनी रेटून धरली होती. जिल्ह्यात प्रशासनाच्या अनास्थेमुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना वाढीसाठी जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आ. श्वेता महाले यांनी केला होता.