कंटेन्मेंट झोनमध्ये दारू विक्रेत्यावर कारवाई

गोंदिया,

गोंदिया शहरानजीक असलेल्या एमआयडीसी मुंडीपार या गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे हे गाव कंटेन्मेंट घोषित करण्यात आले. असे असताना देखील येथे आरोपी दारू विक्री करत होता. यादरम्यान त्याने सोशल डिस्टन्सचे पालन देखील केले नाही. दरम्यान मुंडीपार ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक देवानंद पुनाजी सोनवाने यांनी दंड म्हणून त्याला पावती दिली. परंतु, त्याने पावती देखील घेतली नाही. ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलिसांनी आरोपीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला.