दिवसभरात आठ नव्या कोरोनाबाधितांची भर

वर्धा 4, आर्वी व कारंजा 2-2 बाधित, वर्धा येथे महिलेचा मृत्यु, संख्या पोहचली 59 वर ,

गजानन गावंडे 

वर्धा, 

 जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यामध्ये एक दिवसात सात पॉझेटिव्ह मिळाले होते. मात्र जिल्ह्यात आज एकाच दिवसात 8 रुग्णांची नोंद झाली आहे.या रुग्णांमध्ये वर्धा येथील 4, आर्वी चे 2 तसेच कारंजा तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे. यामध्ये वर्धा येथील
महादेवपुरा येथील महिला इतर आजाराने ग्रस्त असल्याचे सांगण्यात आले.

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
 वर्धा जिल्ह्यातील पिपरी (मेघे) येथील विवाह समारंभातील कहर अजुनही सुरूच आहे. गुरुवारी मिळालेला कोरोनाबाधित रुग्ण विवाहासंबधित जुळलेला असल्याची माहिती आहे. संक्रमितांमध्ये 4 महिला तसेच चार पुरुषांचा समावेश आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आर्वी तालुक्यातील आहे. बुधवारी रात्री आर्वी उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत 35 वर्षिय परिचारिका तसेच 55 वर्षिय सहायक बाधित मिळाला. दोघेही कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. प्रशासनाने रुग्णालयाचे क्वार्टर सील केले आहे. तर त्यांचे निकटवर्तीय संपर्कात आलेल्या 4 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय वर्धा येथील इतवारा कन्टेनमेन्ट झोनमधील रहिवासी 72 वर्षीय महिलेशिवाय सिंदी (मेघे) ग्रामपंचायतमधील हिंदनगर येथील 75 वर्षीय वृध्द तसेच केशव सिटी येथील 37 वर्षिय इसमाचा समावेश आहे. कारंजा (घा) तालुक्यातील काकडा येथे 30 वर्षिय युवक व 20 वर्षिय महिला पॉझेटिव्ह मिळाले. यामधील दोन रुग्णांवर सेवाग्राम तसेच इतर 5 जणांना सावंगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचा अहवाल गुरूवारी सकाळा मिळाला. याशिवाय गुरुवारी दुपारी महादेवपुरा येथील 76 वर्षिय महिलेचा अहवालही पॉझेटिव्ह
आला आहे. ती महिला मधुमेहग्रस्त होती. त्यांची प्रकृती बिघडल्याने बुधवारी सायंकाळी त्यांना सेवाग्राम येथे भरती करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये गुरुवारी आतापर्यंत सर्वाधिक 8 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष असे की अधिकांश रुग्ण
जिल्ह्यातील रहिवासी आहे. यामुळे कोरोना रुग्णांची उलट मोजणी सुरु आहे. जिल्ह्यामधील कोरोनाबाधितांची संख्या 59 तवर पोहचली आहे.

कन्टेनमेन्ट झोन घोषीत

जिल्ह्यामध्ये एकाचवेळी आठ रुग्ण मिळाल्याने प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. वर्धा येथील महादेवपुरा, सिंदी (मेघे) ग्रामपंचायत येत असलेल्या हिंदनगर व केशवसिटी परिसरामध्ये कन्टेनमेन्ट झोन घोषीत करण्यात आले आहे. याशिवाय कारंजा तालुक्यातील काकडा तसेच आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय क्वार्टर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहे.