सेवाग्राम रूग्णालयातून पळाला रूग्ण सुरक्षेवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह

सेवाग्राम रूग्णालयाच्या दुर्लक्षितपणाने अनेक प्रकरण आता समोर येत आहे. बुधवारी सुरक्षारक्षकांच्या हातावर तुरी देत कोरोना वार्डातील वृध्द रूग्णाने पळ काढला. ही बाब समोर येताच रूग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. घटनेमुळे रूग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

वर्धा: सेवाग्राम रूग्णालयाच्या दुर्लक्षितपणाने अनेक प्रकरण आता समोर येत आहे. बुधवारी सुरक्षारक्षकांच्या हातावर तुरी देत कोरोना वार्डातील वृध्द रूग्णाने पळ काढला. ही बाब समोर येताच रूग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. घटनेमुळे रूग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.
शहराला लागून असलेल्या बोरगाव (मेघे) येथील वृध्द इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यामुळे प्रशासनाने त्यास सेवाग्राम रूग्णालयाचे कोरोना वार्डात दाखलकेले होते. वृध्द कोरोना पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार सुरू होता. परंतु, बुधवारी सगळयांना बुचकाळयात टाकणारी घटना समोर आली. सदर रूग्ण कोरोना वार्डातील सुरक्षेला छेद देत बाहेर पळून गेला. बराचवेळ तो आपल्या बेडवर नव्हता. परंतु, याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. माहितीनुसार त्यांचा मुलगा व पत्नी विचारपूस करण्यासाठी रूग्णालयात गेले होते. तेव्हापासून सदर रूग्ण गायब होता. रूग्ण दिसत नसल्याने आरोग्य कर्मचा-यांनी त्याचा शोध सुरू केला. सगळीकडे शोध घेऊनही त्याचा शोध लागला नाही. ही बाब वरिष्ठांना माहित होताच रूग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. यातच सकाळी 11.30 वाजता सदर वृध्द रूग्ण बोरगांव (मेघे) येथील घरी पोहोचल्याची माहिती समोर आली. रूग्णालय प्रशासनाने हालचाली करीत त्यास पकडून परत रूग्णालयात आणत कोरोना वार्डात दाखल केले. याप्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी रूग्णालयाचे डॉ. कलंत्री यांचेशी संपर्क करण्यात आला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
उल्लेखनिय असे की, सगळयांचे समोर कोरोना वार्डातील रूग्ण कोणालाही माहित न होता घरी निघुन जातो. या वार्डात आतमध्ये कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. सदर गंभीर प्रकार समोर आल्याने रूग्णालय प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा प्रकारे दुर्लक्षितपणा करण्यात येत असल्याने जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतात? याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.
२६ सेवाग्राम अधिका-यांना सूचना देवु कोरोना संदर्भात रूग्णालयात शासकीय नियमानुसार काम करण्यात येते. या संबंधात डॉ. कलंत्री यांचेशी संपर्क करावा. कोरोना वार्डातून कोणीही बाहेर जावु शकत नाही. आत प्रवेशही करू शकत नाही. असे झाले असल्यास अधिक माहिती घेऊन अधिका-यांना सूचना देवु. धीरु मेहता, डायरेक्टर, कस्तुरबा हेल्थ सोसाईटी, सेवाग्राम. सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक रूग्णालयाचे कोरोना वार्डातून रूग्ण पळाल्याची माहिती रूग्णालयाने आम्हाला दिलीच नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. रूग्णालय प्रशासनाने सुरक्षेकडे लक्ष दयायला हवे. या संबंधात अधिक माहिती घेण्यात येईल.
डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.