corona

वाशीम,
जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर सुरुच असून, शुक्रवारी दिवसभरात 17 व्यक्तीचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले तर आज, 11 जुलै रोजी 7 व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 194 झाली आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. जून महिन्याप्रमाणे जुलै महिन्यातही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. 11 जुलै रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार मंगरुळनाथ शहरातील संभाजी नगर परिसरातील 2, पंचशील नगर परिसरातील 1, शहापूर परिसरातील 1 आणि गवळीपुरा परिसरातील 1, कारंजा लाड शहरातील माळीपुरा परिसरातील 1 आणि कामरगाव ता. कारंजा येथील 1 व्यक्ती कोरोना बाधित असल्यााचे निष्पन्न झाले. 7 ते 11 जुलै दरम्यान तब्बल 45 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संबधित परिसरात प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावून नागरिकांचे सर्व्हेक्षण सुरु केले आहे.