पोंभूर्ण्यात भाजपाला खिंडार

अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पोंभूर्णा,

तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख भाजप नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे प्रवेश घेतला.

याप्रसंगी चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष महादेवराव पिदुरकर, मीडिया सेलचे प्रमुख नितीन पिंपळशेंडे, तालुक्यातील चेक कार्यकर्ते ऋषी हेपट, सुनील दिवसे, प्रदीप बुटले, संजय पावडे, सुभाष काळे आदीं प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी ऋषी जगन्नाथ हेपटे यांची चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.