भाजपा कार्यकर्त्यांनी पेटवली वीजबिले

बुलडाणा,
कोरोना महामारीमुळे अनेकांच्या हातचे रोजगार गेले असताना विद्युत विभागाने भरमसाठ बिल पाठवून सामान्यांना झटका दिला आहे.
या वाढीव बिलाबद्दल सरकारने अद्याप कुठलेही दिलासादायक निर्णय नसून वीज युनिटचे दर वाढविण्याचा पराक्रम केला. या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे. आ. श्वेता महाले यांनी वीजबिले जाळून शासनाचा निषेध करण्याचे आवाहन केले. त्या आवाहनानुसार भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन एकलारा, केवळद येथे वीजबिले जाळून निषेध करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सकाळ, प्रा. वीरेंद्र वानखेडे, तालुका उपाध्यक्ष अमोल ढोरे यांच्यासह अनेक गावकरी सहभागी झाले होते.