कोणी रस्ता देता का रस्ता…

  • चिखला पार या गावचा रस्ता कुठे
  • लोकांना पावसाळ्यात शोधावं लागते वाट

चिमूर. चिमूर तालुक्यातील एक छोटसं गाव म्हणजे चिखला पार. हे गट ग्रामपंचायत असून ४५ ते ५० घराची वस्ती असणारे गाव १९५ ते २०० इतकी लोकसंख्या या गावची आहे. आज हे गाव चिखला पार नाल्या लगत वसलेलं आहे स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्ष झाली, परंतु या गावाला गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. येथिल लोक रस्त्याची वाट बघत आहे.         

चिमूर ते चिखला पार अंतर ७ किलोमीटर असेल चिमूर खरकाळा सावरगाव बाय पास रस्त्यावर हे गाव वसले आहे  परंतु आजही या गावात जायला रस्ता नाही. सरकारच्या आदेशानुसार गाव तिथे शाळा आणि गाव तिथे रस्ता, पण या गावात रस्ता नाही.  सरकरचे आदेश फक्त कागदोपत्री राहण्या करीता आहे काय असा संतप्त सवाल गावकरी विचारात आहेत.             

देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून हे गाव  वसलेले आहे आज देशाला स्वातंत्र्य मिळवून ७४ वर्ष पूर्ण होत असताना, चिखला पार येथील जनता गावात रस्ता मिळाले काय या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे हे स्वप्न कधी पूर्ण होणार हे अद्याप कुणालाच ठाऊक नाही. २०१९ मध्ये २६ ऑगस्टला चिमूर तालुक्या मुसळधार पाऊस झाला होता, त्यावेळी या गावाला पुराणे वेढले होते. तत्कालीन उपविभागीय अधिकारी बेहरे यांनी शेतकरी भवनात शेतकऱ्यांचे स्थलांतरित केले होते. रस्त्याअभावी दरवर्षी पावसाळ्यात येथील स्थानिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सध्यातरी ग्रामस्थांना कुणी रस्ता देता का रस्ता… असे म्हणण्याची वेळ आली आहे.