Containers of onions stuck at the Mumbai port, Bangladesh border
मुंबई पोर्टवर आणि बांगलादेश बॉर्डरवर रोखून धरण्यात आलेले कांद्याचे कंटेनर

  • अघोषित निर्यातबंदीने कांदा उत्पादक संकटात

लासलगाव (Lasalgaon).  कांद्याचे बाजार भाव वाढतील या अपेक्षेने चाळीत साठवलेला कांदा पावसाळी व दमट वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात सडला तो कांदा उखड्यावर फेकून देण्याची वेळ आली.

शिल्लक असलेल्या कांद्याचे उत्पादन खर्च वाढले आणि कांद्याचे बाजारभाव लासलगावसह कांदा विक्री होणाऱ्या मुख्य बाजार समित्यांमध्ये तीन हजार रुपयांवर गेले आणि केंद्र सरकारने निर्यात होणारा कांदा हा मुंबई पोर्टवर आणि बांगलादेश बॉर्डरवर रोखून धरल्याने या अघोषित निर्यातबंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना फटका बसला यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने तत्काळ निर्यात पूर्ववत सुरू ठेवावी आणि कांद्याच्या बाजारभाव कोसळतील असे कुठलेही निर्बंध लादू नये, अन्यथा संपूर्ण राज्यभरात रस्तारोको, रेलरोकोसारखे तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशाराच दिला आहे. लासलगाव बाजार समिती ७९४ वाहनातून १० हजार क्विंटलची कांदा आवक झाली होती. त्याला जास्तीजास्त ३२०९ रुपये, सरासरी २९५० रुपये तर कमीतकमी ११०० रुपये मिळाला होता. प्रतिक्विंटलला बाजार भाव मात्र माहिती मिळताच २६०० ते २७०० रुपये पर्यंत भाव मिळाला.

अतिवृष्टीने श्रीलंकेतील नवीन कांद्याचे तर पाकिस्तान मधील साठवलेल्या कांद्याचे साधारणत: ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले तर दक्षिणेकडील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे नवीन येणारा कांदा हा बाजारात दखल झालाच नाही त्यात महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील नवीन कांद्याच्या पिकाला ही फटका बसल्याने चाळीत साठवलेला कांद्याला मागणी वाढली आहे. यामुळे कांद्याच्या बाजारभावात वाढ होत आज लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव हे तीन हजार रुपयांवर गेले बाजारभाव वाढत असल्याने झालेले उत्पादन खर्च भरून निघणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या मात्र कांद्याचे वाढते बाजार भाव पाहता मुंबई पोर्टवर मलेशिया, कोलंबो, दुबईसह इतर विदेशात निर्यातीसाठी ४०० कंटेनर मधील १२ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी केंद्र सरकार असमर्थता दाखवल्याने पस्तीस कोटीहून अधिकचा कांदा हा खराब होण्याची भीती निर्यातदार व्यापार्यांकडून कडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या पाच सहा महिन्यापासून कांद्याला बाजार भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील होते मात्र आता कोठेतरी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असताना केंद्र सरकारने अघोषित केलेली निर्यात बंदी ही तत्काळ मागे घ्यावी आणि निर्यात पूर्ववत सुरू करावी अन्यथा रस्ता रोको, रेल रोको सारखे आंदोलन करण्यात येईल -- भारत दिघोळे, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष