बुलडाण्यात कोरोनाचा आलेख वाढतच

बुलडाणा. संपूर्ण विदर्भासह बुलडाण्यातसुद्धा कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत आहे. कोरोना बाधितांचा आकडा हा चढता असून प्रशासनाची चिंता वाढविणारा आहे. काल सायंकाळी १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात नऊ महिला व पाच पुरुष आहेत. त्यात वाडेगाव येथील नऊ, रिधोरा येथील तीन तर पुनोती ता. बार्शी टाकळी येथील दोन जण याप्रमाणे रहिवासी आहेत.
 
दरम्यान काल दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० मुर्तिजापुर उपजिल्हा रुग्णालयातून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन व ओझोन हॉस्पिटल येथून तीन  अशा १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.